नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेईकोचा लेटेस्ट स्मार्टफोन लेई १ या स्मार्टफोनला तुफान प्रतिसाद मिळाला. अवघ्या दोन सेकंदात ७० हजाराहून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनी ९ फेब्रुवारीला या स्मार्टफोनती पुन्हा विक्री करणार आहे. यासोबतच यावेळी कॅश बॅक ऑफरही देण्यात येणार आहे. याआधी लेई१च्या स्मार्टफोन अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाद्वारे खरेदी केल्यास १० टक्क्यांचा कॅशबॅक ऑफर देण्यात आली होती. 


केवळ १० हजार ९९९ रुपयांत उपलब्ध असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स दिलेत. याची किफायतशीर किंमत आणि जबरदस्त फीचर्समुळे या फोनला लोकांनी मोठी पसंती दर्शवली होती. पहिल्या सेलसाठी ज्यांनी रजिस्टर केले त्यांना पुढील सेलसाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.