नवी दिल्ली : लेनोवोने कमी किंमतीत दमदार साऊंड सिस्टीमवाला के५ प्लस स्मार्टफोन लाँच केलाय. बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या  MWC2016मध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आलाय . या स्मार्टफोनची किंमत साधारण १५० डॉलर म्हणजेच १० हजार रुपये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉल्बी साऊंड सिस्टीम खासकरुन एचटीसी एलजी जी४ या स्मार्टफोन्समध्ये असते. लेनोवो के५ प्लसला अॅल्युमिनियम फिनिश देण्यात आलाय. 


या स्मार्टफोनची स्क्रीन पाच इंचाची असून याचे रिझोल्यूशन १,९२० x १,०८० पिक्सेल इतके आहे. यात ६१६ ओक्टाकोर प्रोसेस देण्यात आलाय. १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यात १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा आहे तर ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.