नवी दिल्ली : लेनोवो कंपनीनं आपला नवा कोरा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केलाय. या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे, या स्मार्टफोनमधील ४,००० mAhची बॅटरी... या दमदार बॅटरीमुळे यूजर्स हा फोन जास्तीत जास्त वेळ वापरू शकतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा स्मार्टफोन आहे k6 पॉवर... ६ डिसेंबरला दुपारी १२ वाजल्यापासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनची दमदार बॅटरी तब्बल ९६ तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक, ४८ तासांपर्यंत कॉल आणि १२ तासांहून अधिक वेळपर्यंत वेब सर्फिंगसाठी पुरेशी असल्याचा दावा कंपनीनं केलाय.


या स्मार्टफोनची इतर वैशिष्टय...


- स्क्रीन : ५ इंचाचा फूल HD स्क्रीन... रिजॉल्युशन १०८० पिक्सल


- प्रोसेसर : ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन ४३०


- रॅम : ३ जीबी


- इंटरनल मेमरी : 32 जीबी (एसडीकार्ड सपोर्टीव्ह)


- रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल


- सेल्फी कॅमेरा : ८ मेगापिक्सल (१०८० पिक्सलचा व्हिडिओही)


- इतर : फिंगर प्रिंट स्कॅनर, डॉल्बी ATMOS ऑडिओ सपोर्टिव्ह, ४ जी VoLTE


- ऑपरेटिंग सिस्टम : ६.०.१ मार्शमॅलो