नवी दिल्ली : चायनीज स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोवोने नवा वाईब पी१ च्या सिरीजमध्ये नवा स्मार्टफोन लाँच केलाय. वाइब p1 टर्बो असं या स्मार्टफोनंच नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा स्मार्टफोन ग्रे, सिल्व्हर आणि गोल्डन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये तब्बल 5,000mAh इतकी दमदार बॅटरी आहे. जी तुम्हाला ४५ तासांचा टॉक टाईम देईल. 


या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा तर पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. यात ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येते. तीन जीबी रॅम आहे. 


यात अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर हा स्मार्टफोन चालतो. याची किंमत २० हजार २०० रुपये इतकी आहे.