मुंबई : फेसबुकचा निर्मात मार्क झुकरबर्गचे ट्‌विटर आणि पिंटेरेस्टवरील खाते हॅक करण्यात आले आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवरमाइन टीमने केलेल्या दाव्यानुसार, झुकरबर्ग यांची गेल्या आठवड्यापासून ट्‌विटर आणि पिंटेरेस्टवरील खाते हॅक करण्यात आले आहे, त्यांची दोन्ही खाती आपण हॅक केल्याचा दावा आवरमाइनचा आहे.


दरम्यान, फेसबुकच्या प्रणालीला कोणताही धोका नसल्याचा खुलासा फेसबुकच्या प्रवक्‍त्यांनी केला आहे.


आवरमाइन टीमने म्हटले आहे की, 'झुकरबर्ग यांचे ट्‌विटरवरील खाते हॅक करण्यासाठी त्यांच्या लिंक्‍डइन खात्याचा पासवर्डचा वापर केला आहे. 


झुकरबर्ग यांनी इतर सोशल नेटवर्किंग साइटसाठी एकच युजरआयडी आणि पासवर्ड ठेवला आहे. यामुळे त्यांची खाती हॅक करणे सोपे झाले.