मुंबई : मारुती पुढच्या महिन्यात कमी किंमतीत नवी अल्टो कार बाजारात आणणार आहे. ही कार बेस्ट सेलिंग हॅचबॅकमधली एक आहे आणि आता कंपनीने तिला नवा लूक आणि आणखी काही फिचर्ससह बाजारात आणणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी अल्टो कारचा लूक जुन्या अल्टो सारखास आहे पण ती आता अधिक स्टायलिश आणि आणखी काही फीचर्ससह येणार आहे. नवी अल्टो प्लेटफॉर्म Kei वर बनणार आहे आणि ही कार नॉर्मल वेरिएंटसह टर्बो RS वेरिएंटमध्ये देखील उपलब्ध असणार आहे. या कारचं नॉर्मल वेरिएंट 0.658 लीटर पेट्रोल इंजनचं आहे. जी 53 bhp आहे. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन देण्यात आलं आहे. टर्बो RS वेरिएंटसह 0.658 लीटरचं पेट्रोल इंजिन यामध्ये असणार आहे जी 62 bhpचं असणार आहे.


ही कार फ्यूल एफिशिएंट आहे. कारचं मायलेज 30kmpl हून अधिक आहे. भारतात न्यू जनरेशन अल्टोची किंमत 3 लाख रुपए ते 4.5 लाख रुपये असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.