नवी दिल्ली : देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं आपली नवी कोरी कार लॉन्च केलीय. आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सामान्यांच्या खिशालादेखील सहज परवडणारी आहे.


दमदार मायलेज... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ऑल्टो ८००' या मारुती सुझुकीच्या आकर्षक गाडीचं मायलेज पेट्रोलसोबत २४.७ किलोमीटर प्रतीलिटर तर सीएनजी गाडीचं मायलेज ३३.४४ किलोमीटर प्रती किलोग्रॅम असल्याचा दावा कंपनीनं केलाय.


वैशिष्ट्यं


कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑल्टो ८०० ची सुरुवातीची किंमत २.४९ लाख रुपये असेल. नवी ऑल्टो ८०० च्या एक्सटीरियर आणि इन्टिरिअर दोघांमध्येही बदल करण्यात आलेत.


नवी ऑल्टो जुन्या ऑल्टोहून लांबलचक असेल, तसंच या गाडीचं मायलेजही अधिक असेल. आत बसण्यासाठी जास्त जागा आणि सुरक्षा हे या गाडीचं वैशिष्ट्यं म्हणावं लागेल. 


ऑल्टोचा इतिहास


गेल्या १२ वर्षांपासून 'ऑल्टो' ही गाडी भारतात टॉप सेलिंग मॉडल बनलीय. ऑल्टो ही एकुलती एक भारतीय कार ब्रॅन्ड आहे ज्यानं ३० लाखांच्या विक्रीचा आकडा पार केलाय.