नवी दिल्ली: मारुती सुजुकीनं आपल्या पहिल्यापेक्षा जास्त पॉवरफूल अशा बलेनो आरएसची पहिली झलक दाखवली आहे. बलेनो आरएसमध्ये बूस्टरजेट टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन लावण्यात आलं आहे. भारतीय बाजारामध्ये लॉन्च झाल्यावर मारुतीच्या या गाडीची स्पर्धा असेल ती फोक्सवॅगनची पोलो जीटी टीएसआय आणि अबार्थ पुंटोबरोबर.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहेत गाडीची फिचर्स ?


या गाडीच्या डिझाईनवर नजर टाकली तर, पुढच्या बंपरला थोडं वाढवण्यात आलं आहे. तर जेनन हँडलॅम्प आणि डे-टाईम रनिंग एलईडी लाईट बलेनोच्या टॉप वेरिएंटची घेण्यात आली आहेत. 


बलेनो आरएसची साईड प्रोफाईलमध्ये डायमंड कट अलॉय व्हील आणि स्लिम रेन गार्ड देण्यात आलं आहे. गाडीच्या मागच्या बाजूला मात्र जास्त बदल करण्यात आलेले नाहीत. फक्त बंपरवर ड्युअल टोन फॉक्स डिफ्यूजर देण्यात आले आहेत. 


बलेनो आरएसच्या केबिनला स्पोर्ट्स लूक देण्यात आला आहे. बलेनोच्या टॉप वेरिएंटमधून ७ इंचाचा स्मार्ट प्ले इंफोटेंमेंट सिस्टिम, ऍपल कार प्ले देण्यात आला आहे. तर इंन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये मल्टी इंफो डिस्प्ले देण्यात आला आहे. याबरोबरच ऑटो क्लायमेटसारखे फिचर्सही या गाडीमध्ये देण्यात आले आहेत.