मुंबई: मायक्रोमॅक्सनं दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. बोल्ट सुप्रीम आणि बोल्ट सुप्रीम 2 अशी या दोन फोनची नावं आहेत. यातला बोल्ट सुप्रीम 2,749 रुपयांना आहे तर बोल्ट सुप्रीम 2 हा स्मार्टफोन 2,999 रुपयांना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायक्रोमॅक्सच्या या दोन्ही फोन 3G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारे आहेत. या दोन्ही फोनच्या फिचर्सवर एक नजर टाकूयात. 


डिसप्ले


मायक्रोमॅक्स बोल्ट सुप्रीमला 3.5 इंचांचा डिसप्ले आहे, तर बोल्ट सुप्रीम 2 ला 3.9 इंचांचा डिसप्ले देण्यात आला आहे. 


ऑपरेटिंग सिस्टीम


या दोन्ही स्मार्टफोनना ऍन्ड्रॉईड लॉलीपॉप 5.1ची ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. 


प्रोसेसर आणि स्टोरेज


या दोन्ही फोनना 1.2GHz क्वाडकोअर प्रोसेसर आहे. तसंच 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमतून 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. 


कॅमेरा


या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 


बॅटरी


बोल्ट सुप्रीममध्ये 1200 mAh पॉवरची तर बोल्ट सुप्रीम 2 मध्ये 1400 mAh पॉवरची बॅटरी देण्यात आली आहे.