न्यूयॉर्क : लिंक्डइन ही साइट मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार आहे. लिंक्डइन ही व्यावसायिकांसाठी आणि तुमचे कलागुण एकमेकांसमोर मांडण्याची, संपर्क ठेवण्याची सर्वात मोठी साईट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिंक्डइनला मायक्रोसॉफ्ट ही साइट 26.6 बिलियन डॉलरला खरेदी करणार आहे. 26.6 बिलियन डॉलरची भारतीय रुपयामध्ये किंमत 1 लाख 78 हजार 485 कोटी रुपये एवढी होती.  
     
लिंक्डइन साइडच्या शेअर्सची किंमत  शुक्रवारी  196 डॉलर होती. शेअर मार्केटच्या सुरुवातीलाच लिंक्डइनच्या शेअर्सनी 48 टक्क्यांपर्यंत उसळसी. मात्र त्याच वेळी मायक्रोसॉफ्टचे शेअर्स 3.3 टक्क्यांनी पडले होते. लिंक्डइन या साइटचे चेअरमेन रेड हॉफन यांनी म्हटलं आहे, लिंक्डइनला आज पुन्हा संस्थापक प्राप्त झाला.


लिंक्डइन ही साइट मायक्रोसॉफ्टच्या उत्पादकता आणि व्यावसायिक प्रक्रियेचा भाग होणार असल्याची माहिती सत्या नाडेला यांनी दिली आहे.
     
जेफ वेनर हे लिंक्डइन खरेदीविषयी रिड आणि जेफशी बऱ्याच काळापासून बोलत होते. खरेदीसंदर्भातला करार 2016 मध्ये होणार असल्याचं कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.