मुंबई : देशातील सर्वात प्रभावशाली ब्रॅण्ड म्हणून यंदा परदेशी ब्रॅण्ड्सला भारतीयांनी पसंती दिल्याचे दिसत आहे. यात नंबर वन गूगल असून  भारतीय मायक्रोसॉफ्ट चौथ्या स्थानावर तर फ्लिपकार्ट ही पहिली भारतीय कंपनी सातव्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व भारती एअरटेल अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतरराष्ट्रीय संशोधन संस्था असणा-या लेप्सोसने केलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेक परदेशी कंपन्यांना भारतीयांनी झुकते माप दिलेय. भारतीय कंपन्यांना या यादीमध्ये तळाचे स्थान मिळालेय. भारतीयांनी कोणत्या दहा ब्रॅण्डसला सर्वाधिक प्रभावशाली ब्रॅण्डस म्हणून पसंती दाखवली आहे ते जाणून घ्या.


१. गूगल : भारतातील १० सर्वात प्रभावशाली ब्रॅण्डच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.  


२. फेसबूक : जगातील अव्वल सोशल नेटवर्किंग साइट असणारी फेसबूक ही कंपनी भारतातील १० सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.


३. जीमेल : 'गूगल'चीच इमेल सेवा असणारी जीमेल भारतीयांची तीसरी पसंती आहे.


४. मायक्रोसॉफ्ट : भारतीयांनी मायक्रोसॉफ्ट या कंपनीला प्रभावशाली कंपनीच्या यादीत चौथ्या स्थानावर ठेवले आहे.


५. सॅमसंग : कोरियन कंपनी असणारी सॅमसंग कंपनी ही भारतामध्ये मोबाइल्ससाठी लोकप्रिय असून यादीमध्ये पाचवे स्थान मिळाले आहे.


६. व्हाट्सअॅप : इन्सटन्ट मेसेजिंग अॅप्लिकेशन असणाऱ्या व्हॉट्सअॅप प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.


७. फ्लिपकार्ट : बंगळुरुमध्ये मुख्यालय असलेल्या भारतीय फ्लिपकार्ट या कंपनीने सातवा क्रमांक पटकावलाय.


८. अॅमेझॉन : ऑनलाइन शॉपिंगच्या क्षेत्रात फ्लिपकार्ट आव्हान देण्यासाठी भारतात दाखल झाली. अॅमेझॉनही प्रभावशाली कंपन्यांच्या यादीमध्ये आठव्या स्थानावर आहे.


९. एसबीआय : स्टेट बँक ऑफ इंडियाला भारतीयांनी या यादीमध्ये नव्या स्थानावर आहे.


१०. अरटेल : एअरटेल या मोबाइल सर्विस प्रोव्हाइडर कंपनी यादीत दहाव्या क्रमांकवर आहे.