मुंबई :  राज्यातील युवकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१७ मध्ये कोणत्या परीक्षा कोणत्या तारखेदरम्यान होतील, याची यादी जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१७ साठी 'एमपीएससी'चं वेळापत्रक
१) . राज्यसेवा परीक्षा २०१७ची जाहिरात डिसेंबर, २०१६ मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. ०२ एप्रिल, २०१७ रोजी होईल तर मुख्य परीक्षा दिनांक १६, १७,१८ सप्टेंबर २०१७ अशी तीन दिवस असेल.


 २) . पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ ची जाहिरात जानेवारी, २०१७  मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. १२ मार्च, २०१७ रोजी तर मुख्य परीक्षा दि. ११ जून, २०१७ रोजी होईल.


३) . सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०१७ ची जाहिरात जानेवारी, २०१७ मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. ३० एप्रिल, २०१७ रोजी तर मुख्य परीक्षा दि.०६ ऑगस्ट, २०१७ रोजी होईल.


 ४) . लिपिक टंकलेखक परीक्षा २०१७ ची जाहिरात फेब्रुवारी, २०१७  मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. १४  मे, २०१७  रोजी तर मुख्य परीक्षा दि. ०३ सप्टेंबर, २०१७ रोजी होईल.


५) . दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०१७ ची जाहिरात फेब्रुवारी, २०१७ मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. २१ मे, २०१७ रोजी तर मुख्य परीक्षा दि. ०८ ऑक्टोबर, २०१७ रोजी होईल.


६) . दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क परीक्षा २०१७ ची जाहिरात फेब्रुवारी, २०१७ मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. ०२ जुलै, २०१७ रोजी तर मुख्य परीक्षा दि. १५ ऑक्टोबर २०१७ रोजी होईल.


८) . महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१७ ची जाहिरात मार्च, २०१७ मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. ०४ जून, २०१७ रोजी तर मुख्य परीक्षा दि. २४ सप्टेंबर, २०१७ रोजी होईल.


९) . महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१७ ची जाहिरात मार्च, २०१७ मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. ०९ जुलै, २०१७ रोजी होईल. त्यापैकी महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१७ व महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१७, दि. २६ नोव्हेंबर, २०१७ रोजी, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१७, दि. १७ डिसेंबर, २०१७ रोजी, महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१७, दि. २४ डिसेंबर, २०१७ रोजी होईल.


१०) . सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ची जाहिरात एप्रिल, २०१७ मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा दि. २५ जून, २०१७ रोजी होईल.


११) . सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा २०१७ची जाहिरात एप्रिल, २०१७ मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. १६ जुलै, २०१७ रोजी होईल. त्यापैकी पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा २०१७, दि. ०५ नोव्हेंबर,२०१७ रोजी, सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा २०१७, दि. १० डिसेंबर, २०१७ रोजी, विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१७, दि. ०७ जानेवारी, २०१८ रोजी होईल.


१२). कर सहायक परीक्षा २०१७ ची जाहिरात एप्रिल, २०१७ मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. २० ऑगस्ट २०१७ रोजी तर मुख्य परीक्षा दि. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी होईल.


१३). महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०१७ची जाहिरात एप्रिल, २०१७ प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. ३० जुलै, २०१७ रोजी तर मुख्य परीक्षा दि. १७ डिसेंबर, २०१७ रोजी होईल.


१४) . विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ ची जाहिरात सप्टेंबर, २०१७ मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा दि. ०५ नाव्हेंबर, २०१७ रोजी होईल.