बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडल्याचा वैज्ञानिकांचा दावा
गेल्या अनेक दशकांपासून गूढ बनून राहिलेल्या अटलांटिक महासागरातील बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय. या ठिकाणी गेलेल्या आतापर्यंत 75 विमाने तसेच 100हून अधिक जहाजांचा थांगपत्ता लागलेला नाहीये. यात एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत या बर्म्युडा ट्रँगलच्या या रहस्याचा उलगडा झालेला नव्हता.
नवी दिल्ली : गेल्या अनेक दशकांपासून गूढ बनून राहिलेल्या अटलांटिक महासागरातील बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय.. या ठिकाणी गेलेल्या आतापर्यंत 75 विमाने तसेच 100हून अधिक जहाजांचा थांगपत्ता लागलेला नाहीये. यात एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. मात्र आता बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य समोर आलेय.
बर्म्युडा ट्रँगल येथील षटकोनी ढगांमुळे असे प्रकार तेथे घडत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय. डेली मेलमधील रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांनी या ढगांना Hexagonal clouds असे नाव दिलेय. तसेच या भागात 170 मैल प्रति तासच्या वेगाने वारे वाहतात. या ढगांना भेदून जाणारे वारे पाण्यातील जहाजाला अथवा आकाशात उडणाऱ्या विमानांवर इतक्या मोठ्या तीव्रतेने आदळतात की विमान अथवा जहाजाचे अवशेषही सापडत नाहीत. हे ढग दिसण्यास विचित्र असतात. एका ढगाची व्याप्ती साधारण 45 फूट इतकी असते. या ढगांमध्ये एका शक्तीशाली बॉम्बपेक्षाही अधिक उर्जा असते.
हवामान शास्त्रज्ञ रेंडी केरवनी यांच्या मते हे ढग विस्फोटक परिस्थिती निर्माण करतात. यामुळे आसपासच्या परिसराचेही नुकसान होते. ढगांना भेदून जाणाऱ्या वाऱ्यांचा समुद्राच्या पाण्याशी संपर्क आल्यास त्या रौद्ररुप धारण करतात. त्सुनामीपेक्षाही मोठ्या लाटा तयार होतात. शास्त्रज्ञांच्या मते बर्म्युडा बेटाच्या दक्षिणकडे हे ढग तयार होतात आणि 20 ते 55 मैलापर्यंत पसरतात.