मुंबई : आजकाल फोन नेहमी आपल्यासोबत असतो. जिथे जिथे आपण जातो फोनशिवाय जात नाही. मात्र काही अशी काही ठिकाणे असतात जिथे चुकूनही आपला फोन ठेवू नका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पँटच्या मागच्या खिशात कधीही फोन ठेवू नका. यामुळे फोन क्रॅश होण्यासोबतच बॅटरी खराब होण्याची शक्यता अधिक असते. तसेच खिशात असलेल्या कॉईन तसेच चाव्यांमुळे फोनच्या स्क्रीनला स्क्रॅचेस पडण्याची अधिक शक्यता असते.  


अनेकांना सवय असते कार चालवत असताना फोनला ग्लव कंपार्टमेंटमध्ये ठेवण्याची. मात्र यातून निघणाऱ्या उष्णतेमुळे फोनच्या आतील पार्ट डॅमेज होण्याची भिती असते. 


बॅगेच्या बॉटम पॉकेटमध्येही फोन ठेवू नका. 


किचनमध्ये काम करत असाल तर कधीही तुमचा फोन ओव्हन अथवा गॅसजवळ ठेवू नका. यामुळे बॅटरी आणि डिस्प्ले खराब होण्याची शक्यता असते. 


अधिककाळ फोन उन्हात राहिल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. 


टेबलच्या कोपऱ्यावर कधीही फोन ठेवू नका. व्हायब्रेशन होत असताना फोन टेबलावरुन पडल्यास तो तुटण्याची भीती असते. 


फोनला बाथरुममध्ये ठेवणेही चांगले नाही. यामुळे त्याला पाणी लागण्याची शक्यता असते. 


जिथे जास्त धूळ असेल अशा जागी फोन ठेवणे टाळा. धुळीचे कण तुमच्या फोनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करु शकतात.