पुढील वर्षी लाँच होणार नोकियाचा स्मार्टफोन
प्रसिद्ध ब्रँड नोकिया लवकरच मोबाईलच्या जगात पुन्हा प्रवेश करणार आहे. पुढील वर्षी नोकियाचा नव्या जनरेशनचा स्मार्टफोन लाँच होणार आहे.
हेलसिंकी : प्रसिद्ध ब्रँड नोकिया लवकरच मोबाईलच्या जगात पुन्हा प्रवेश करणार आहे. पुढील वर्षी नोकियाचा नव्या जनरेशनचा स्मार्टफोन लाँच होणार आहे.
फिनलँडची कंपनी एचएमडी ग्लोबलने गुरुवारी याबाबतची माहिती दिली. लीक रिपोर्टनुसार, नोकियाचे डी1सी स्मार्टफोन दोन पर्यायांत उपलब्ध असतील. एक 5 इंचाचा तर दुसरा 5.5 इंचाचा असेल. तसेच 2 आणि तीन जीबी रॅम हे पर्याय असतील.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी असेल. एका स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेल रेयर कॅमेरा असेल तर दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. तर सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सेल असेल.
नोकियाच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचे स्नॅपड्रॅगन 820 अथवा 821 प्रोसेर असू शकते. असंही सांगितलं जातय की हा नवा स्मार्टफोन वॉटरप्रूफ असणार आहे.