मुंबई : नोकिया कंपनी पुन्हा एकदा मोबाईलच्या क्षेत्रात दमदार पाऊल ठेवत आहे. नोकिया एज हा नोकियाचा स्मार्टफोन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बाजारात दाखल होत आहे. याची शानदार डिझाईन आहे. हा फोन विना फ्रेम असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकिया ही कंपनी मायक्रोसॉप्टने खरेदी केल्यानंतर नोकिया मायक्रोसॉप्ट या नावाने बाजारात दाखल झाला. आता मात्र, नोकिया स्वत:चा पुन्हा ब्रॅन्ड असणार आहे. नोकियाचा नवा स्मार्टफोन बाजार दाखल होण्यापूर्वी याचा लूक आधीच व्हायरल झालाय. या स्मार्टफोनला दोन्ही बाजुला काठ नसणार आहेत. बेझल लेस स्क्रीन असणार आहे. या फोनचा लूक जबरदस्त आहे. दणकट बॉडी असणार आहे.


१२ एमपी फ्रंट कॅमेरा तर मागील कॅमेरा २३ एमपी असणार आहे. हा कॅमेरा फ्रिंगरप्रिंट असणार आहे. ३.५ एमएम हेडफोड जॅक असणार आहे. त्यामुळे हा सुपर वायरलेस हेडफोन असणार आहे. हा नोकिया एज अॅन्ड्राईड ७.० सिस्टीमवर चालणार आहे. याची उच्च दरर्जाची मेमरी कॅपॅसिटी असणार आहे.