नवी दिल्ली :  जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत संचार निगम लिमीटेड यांनी आपल्या स्पेशल टेरिफ व्हॉवचर्सचा डाटामध्ये चार पट वाढ केली आहे. असे बीएससएनएलने पत्रकात म्हटले आहे. 


 


२९१ रुपयात आता ८ जी डाटा २८ दिवसांच्या व्हॅलिडीटीसाठी मिळणार आहे. पूर्वी  याच किंमतीत फक्त २ जीबी डाटा देण्यात येत होता. तर ७८ रुपयात २ जीबी डाटा देण्यात येणार आहे. 


टेलीकॉम इंडस्ट्रीत सर्वात कमी दरात म्हणजे ३६ रुपयात १ जीबी डाटा देण्याची बीएसएनएलकडून ऑफर देण्यात आली आहे. 


रिलायन्सने आपल्या ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत फ्री डाटा देण्याची ऑफर दिली आहे. पण दिवसात १ जीबी डाटा वापरण्याची मुभा दिली आहे. आता अनेक युजर्स असल्याने अनेकांचा स्पीड कमी झाला आहे.