मुंबई : आपला मोबाईलमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधतात. तुम्हीही न्युमरिक लॉक, पॅटर्न लॉक, फिंगरप्रिंट, वॉईस तसेच आयस्कॅनर यासारखे अनेक अॅप्स वापरले असतील. मात्र आता एक असे अॅप आलेय ज्यामुळे तुम्ही इमोजीपासून तुमचा पासवर्ड बनवू शकणार आहात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत तुम्ही कमेंट्स अथवा स्टेट्स अपडेटमध्ये इमोजींचा वापर केला असेल. मात्र पासवर्डसाठी इमोजीचा असा वापर पहिल्यांदाच होणार आहे. 


रिसर्चर अँड्रॉईड स्मार्टफओनसाठी इमोजी बेस लॉगइन सिस्टीम तयार करण्याचे काम सुरु आहे. ज्यामुळे तुम्हाला मोबाईल अनलॉक करण्यासाठी आता एखादा नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा इमोजी तुम्ही पासवर्ड म्हणून वापरु शकणार आहात.