मुंबई : आपल्या देशाला आणि मुंबईसह देशातील प्रमुख शहरांना दहशतवादाचा मोठा धोका आहे. दहशतवादी बॉम्बस्फोट करून देशाचे स्य़ैर्य बिघडवण्याचा प्रयत्न करतात. याचा मुकाबला करण्यासाठी आणि बॉम्ब शोधून ते निकामी करण्यासाठी संरक्षण दलाच्या रोबोटीक डिपार्टमेंटने एक रोबोट तयार केला आहे. 


देशांतर्गत सुरक्षेबरोबरच देशाची सीमा सुरक्षित करण्यासाठी आणि नक्षलवादी भागात उपयोगी पडेल असे एक वाहन संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागाने तयार केले आहे. सुरुंग आणि बॉम्ब शोधणाचे तंत्रज्ञान यात आहे. विशेष म्हणजे हे वाहन आपोआप काम करते. त्याला मनुष्याची अथवा रिमोटचीही गरज लागत नाही.