नवी दिल्ली : फेसबूक मॅसेंजरमध्ये आता यूजर्स व्हिडिओ ग्रुप चॅट करु शकणार आहेत. कंपनीने हे नवे फिचर अपडेट केलं आहे. ग्रुप चॅटचा वापर अँड्रॉइड स्मार्टफोन तसेच आयफोन आणि वेब यूजर्स देखील करु शकणार आहेत. फेसबूकच्या मते यूजर्स अनेक दिवसांपासून याची मागणी करत होते. त्यामुळे हे नवं फिचर तयार करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५० यूजर्स करु शकतील एकसोबत व्हिडिओ चॅट


फेसबूक मॅसेंजर यूजर कोणत्याही ग्रुप व्हिडियओ कॉल दरम्यान स्क्रीनवर पाहू शकणार आहे. स्क्रीनवर ६ लोकं एक सोबत पाहता येणार आहे. इतर यूजर्ससोबत वॉईस किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून कनेक्ट राहता येणार आहे. कंपनीने म्हटलं आहे की, कॉलमध्ये ६ पेक्षा अधिक लोकं जोडले जाऊ शकता तेव्हा फक्त जास्त बोलणारे युजर्स स्क्रीनवर दिसणार आहेत.


सर्वात आधी फेसबूक मॅसेंजर अॅपला ओपन करावे लागेल. त्यानंतर ग्रुप चॅट ओपन करा. आता ग्रुपमध्ये टॉपला राईटला व्हिडिओचा आयकॉन दिसेल. त्याला टॅप करा. ग्रुपच्या सर्व मेंबर्सला रिंग जाईल. तुम्ही कोणाचाही कॉल मध्येच संपवू शकता.