मुंबई : मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या ग्राहक खेचण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसून येते. काही कंपन्या कमी किमतीत स्मार्ट फोन देत आहे. तर काही मोबाईल कंपन्या कॉल दरात सूट देत आहेत. तर १ रुपयांत १ जीबी ३जी इंटरनेट देण्याची घोषणा आयडिया कंपनीने करुन धमाका उडवून दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयडिया कंपनी केवळ एक रुपयात १ जीबी ३जी इंटरनेट डाटा देणार आहे. ही शानदार ऑफर आयडिया मोबाईल अॅपच्या मदतीने मिळवू शकता. आयडिया मोबाईल अॅपची ही ऑफर अॅंड्राईट, आयओएस आणि विंडोज फोनवर असणार आहे.


ही ऑफर केवळ आयडिया नेटवर्कचा वापर करत आहेत, तेच याचा लाभ उठवू शकतात. याचा लाभ घेण्यासाठी आयडिया अॅप डाऊनलोड करुन घ्यावा लागणार आहे. त्यानंतर आयडिया मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करावयाला लागणार आहे. त्यानंतर एक रुपयांचा रिचार्जचे ऑप्शन दिसेल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये १ जीबीपर्यंत ३ जी डाटा केवळ एक रुपयांत मिळू शकेल.