मुंबई : वन प्लसने नुकतेच नवीन मॉडेल वन प्लस ३ लाँच झाले आहे. कमी किंमतीत सगळ्यात चांगले फिचर्स देणारा म्हणून वन प्लस फोन्सची मार्केटमध्ये ओळख आहे. मार्केटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता प्रत्येक कंपनी वेगवेगळे फिचर्स घेऊन येते. मात्र कोणताही स्मार्टफोन प्री-लोडेड पॉर्न फिल्म्सचे फिचर घेऊन येईल असे कधी वाटले होते का ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन प्लस ३ या फोनबाबत एक आश्चर्यजनक माहिती समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार वन प्लस ३ विकत घेणाऱ्या एका ग्राहकाने रेडिट या सोशल साईटवरून तक्रार केलीये की या फोन मध्ये प्री-लोडेड पॉर्न फिल्म्स होत्या.


मात्र ही तक्रार पॉर्न फिल्म्स असण्याच्या नाखूशीबाबत नसून ती एच.डी क्वालिटीमध्ये नाही म्हणून या ग्राहकाने आक्षेप घेतला आहे.