मुंबई : फोनवर खोटं बोलणाऱ्या व्यक्ती अनेकांनी आपल्या बाजुला अनुभवले असतील. व्हॉट्सअॅपर देखील चॅट करतांना अनेक जण खोटे बोलतात हे काही नवीन नाही आहे. पण आता यामुळे अशी लोकं अडचणीत येणार आहेत. व्हॉट्सअॅपने आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्याने तुम्ही कुठे आहात याची माहिती लगेचच समोरच्या व्यक्तीला कळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरूण पिढीतला सर्वात आकर्षणाचा विषय असलेल्या व्हॉट्स अॅपने आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने मंगळवारी व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरु केल्याचे जाहीर केले. यापूर्वी कंपनीने बीटा व्हर्जनमध्ये व्हिडिओ सुविधा सुरु केली होती. त्यामुळे चाचणी स्वरुपातील व्हिडिओ कॉलिंगचा सर्व स्मार्टफोन धारकांना लाभ मिळाला नव्हता. पण आता एका अपडेटनंतर व्हॉटसअपवरुन व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे. 


अँड्रोइड, आयवोएस आणि विडोंज स्मार्टफोनसाठी अपडेट उपलब्ध केले आहेत.
अँड्रोइड फोन वापरणाऱ्यांसाठी गुगल प्ले वर जाऊन अपडेट करावं लागेल. तर आयवोएस स्मार्टफोनसाठी स्टोअरमधून व्हिडिओ कॉलिंगचे अपडेट मिळणार आहेत. विंडोज स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी विंडोज स्टोअरला भेट द्यावी लागेल. फ्रंट किंवा मागील बाजूला असणाऱ्या कॅमेराचा वापर करुन व्हिडिओ कॉल करु शकता. 


नेटवर्कनुसार व्हिडिओ कॉलची सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल, असा दावा व्हॉटसअॅप कंपनीने केला आहे. व्हिडिओ कॉलिंग सुरु असताना तुम्ही स्मार्टफोनवर इतर गोष्टी देखील करु शकता.