मॉस्को : फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईटवरून लोकांमध्ये नकारात्मकता फैलावली जाते, याबद्दल एक नवा शोध समोर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोधातील निष्कर्षानुसार, सोशल साईटच्या वापरकर्त्यांमध्ये इतरांप्रती इर्षेची भावना निर्माण होते. आपल्याहून अधिक आनंदी दिसणाऱ्या आपल्या मित्रांना पाहून ही भावना जन्म घेते.


शोधकर्त्यांनुसार, लोकांमध्ये नकारात्मकता आणि निराशा पसरवण्यात 'लाईक' मिळवण्यात मुख्य भूमिका निभावतं. आपल्या पोस्टवर अपेक्षेएवढे लाईक न मिळाल्यानं अधिकाधिक लोक निराश होतात. 42 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मित्रांच्या पोस्टला अधिक लाईक मिळाल्यामुळे त्यांच्या मनात इर्षा निर्माण होते. 


रशिया स्थित कॅस्परस्काय लॅबच्या शोधकर्त्यांनी जगभरातील 16,750 लोकांवर केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, लोक सोशल मीडियामुळे कुंठित होत आहेत. सोशळ मीडियावर अधिकाधिक वेळ घालवल्यानं अनेक कारणांनी त्यांच्यात नकारात्मक भावना जन्म घेतात... आणि या भावना सोशल मीडियाच्या सकारात्मक प्रभावाहून अधिक प्रभावी असते.