वेळ - दुपारची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थळ - सिमेंट्र काँक्रिटच्या जंगलातील एक घर
रोजच्या धावपळीतून काहीसे निवांत क्षण शोधत कल्याणमध्ये राहणा-या प्रताप काळोखेंनी हॉलमध्येच फ्रेंच विंडोलगत आपल्या भाच्यासोबत अंगतपंगत मांडली होती...


खाली व्हिडिओ आहे.... 


गप्पा मारत जेवण रंगात आलेलं असतांनाच तो आला....
तो देखणा पाहुणा बघून दोघांनाही आनंदही झाला आणि अचंबाही वाटला...


तो होता लालचुटुक ओठांचा, अंगावर हिरवा शालू नेसलेला हिरवा रावा...


अगदी विश्वासानं तो प्रताप यांच्या ताटाजवळ विसावला..
कुठल्यातरी जुन्या ऋणानुबंधानं बांधल्यासारखं प्रतापसोबत त्यानं आनंदानं दोन घास खाल्ले...


कुठला हा पक्षी, माणसांच्या वस्तीत एवढा विश्वासानं शिरला कसा ? 
आजकाल माणसांचाही माणसांवरचा विश्वास उडत असतांना हा पोपट बघा किती विश्वासानं प्रताप यांच्या घरात वावरतोय....
आपलं जेवण थांबवून प्रताप यांनी या देखण्या पाहुण्याचं आदरातिथ्य केलं...  त्याला मायेनं वरण भात भरवला...
अतिथी देवो भव हा भाव प्रताप यांच्या चेह-यावर होता तर अन्नदाता सुखी भव असं जणू हा पोपट म्हणत होता...
साधारण चार पाच मिनिटं हा भोजन समारंभ रंगला,, प्रताप यांचे भाचे सिद्धार्थ यांनी हा सगळा सोहळा मोबाईल फोनवर टिपला...


खाली व्हिडिओ आहे.... 


भोजन झाल्यानंतर मग पोपट आनंदानं भुर्र उडून गेला....
कोण होता तो ? काय होता त्याचा ऋणानुबंध... घराण्यातला कुणी पुराणपुरुष तर या निमित्तानं ख्यालीखुशाली विचारुन गेला नाही ना?


केवळ काही मिनिटाचं नातं... पण आठवणी मात्र आयुष्यभर टिकतील अशा....


पाहा याचा व्हिडिओ...