सोशल मीडियावर न्यू ईयरपेक्षा मोदींचीच जास्त चर्चा
आज २०१६ या वर्षातील अखेरचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा दिवस. मात्र यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे चित्र काही वेगळेच आहे.
मुंबई : आज २०१६ या वर्षातील अखेरचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा दिवस. मात्र यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे चित्र काही वेगळेच आहे.
५० दिवसांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानकपणे नोटाबंदी जाहीर केली होती. त्यानंतर देशभरात चलनकल्लोळ सुरु झालाय. अद्यापही हा नोटांचा तुटवडा कमी झालेला नाही. त्या रात्रीच्या भाषणात मोदींनी आणखीही बरेच महत्त्वाचे सांगितले होते. त्यापैकी एक म्हणजे वर्षाच्या शेवटी महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
त्यामुळे न्यू ईयर सेलिब्रेशनपेक्षा सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या भाषणाचीच चर्चा अधिक होतेय. प्रत्येकजण आपापल्या परीने मोदी कोणत्या नव्या घोषणा करणार याचा अंदाज बांधतायत.
यावरुन सोशल मीडियावर किस्सेही रंगवले जातायत. तसेच जोक्सही फिरतायत. अनेकांनी जोक्सद्वारे मोदींना पाठिंबा दिलाय. तर अनेकांनी खिल्लीही उडवलीये. अनेकांचे असेही म्हणणे आहे