नवी दिल्ली : सोशल मीडिया माध्यम फेसबूकवर अनेक काही महाभाग मुली तसेच स्त्रियांना अश्लिल मेसेज पाठवतात. काही जण याकडे दुर्लक्ष करुन संबंधितांना आपल्या प्रोफाईल्समधून डिलीट करतात. मात्र, राष्ट्रपतींच्या मुलीला असाच अश्लिल मेसेज पाठविणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलींना त्रास देणारे अनेक आंबटशौकिनांची कमी नाहीत. अनेकदा असे संदेश पाठवणाऱ्यांना मुली ब्लॉक करुन दुर्लक्ष करतात. मात्र, त्यांचा त्रास देण्याचा उद्योग सुरुच असतो. जरी त्याला ब्लॉक केले तर ते आणखी दुसऱ्या मुलीला त्रास देतात. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी अश्लिल मेसेज पाठवणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला.
 
पार्थ मंडल शर्मिष्ठा मुखर्जी यांना वाईट मेसेज पाठवत होता. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्याला ब्लॉकदेखील केले. त्यानंतर त्यांनी पार्थ मंडलच्या फेसबूक प्रोफाईलचे आणि पाठवलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट काढून आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केले. तसंच इतरांनी या व्यक्तीपासून सावध राहावे, असे आवाहनही केले आहे.