मुंबई : लोकप्रिय फोटो-शेयरिंग साइट इंस्टाग्रामवर '10 लाख' पेक्षा ज्यास्त हार्डकोर पोर्न व्हिडीओ उपलब्ध आहेत, हे पॉर्न व्हिडीओ या वेबसाईटवर गुप्त ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द सन या दैनिकाच्या रिपोर्टनुसार 13 वर्षापेक्षा लहान मुलाच्या हातात पॉर्न कंटेन्ट लागू शकतो. रिपोर्टनुसार वेबसाईटची न्युडिटीविरोधात कडक पॉलिसी आहे. मात्र अनसेंसर्ड पॉर्नला अपलोड करण्यासाठी युझर्स अरबी भाषेत लांब लचक हॅशटॅगचा वापर करून, मॉडरेटरपासून बचाव करत पॉर्न अपलोड करतायत, पाहतायत. 


टेक ब्लॉगर जेड इस्माइलने एक हॅशटॅग सोबत (ज्याचा अर्थ अरबी भाषेत सिनेमा असा आहे) सर्च केला तेव्हा त्यांना अचानक पॉर्न व्हिडीओ मिळाला, जेड म्हणतो की, त्याने वेबसाईटवर १० लाखपेक्षा जास्त सेक्स फिल्म पाहिल्या. 


जेडने आपल्या ब्लॉगवर लिहिलंय 'इंस्टाग्राम ने न्यूडिटी आणि सेक्सशी संबंधित इंग्लिश हॅशटॅग वापरण्यास बंदी लावली आहे, तरी देखील युझर्स इंग्रजीशिवाय स्थानिक भाषांमध्ये हॅशटॅग वापरून पॉर्न शोधतायत. इन्स्टाग्रामकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.