जयपूर : जर्मनी ची स्पोर्टस कार कंपनी पोर्शनं भारतात आपली नवी 'पॅनामेरा' सादर केलीय. बाजारात 'पॅनामेरा टर्बो' आणि 'पॅनामेरा टर्बो एक्झीक्युटिव्ह' असे दोन मॉडल्स दिसतात.


पॅनामेरा टर्बो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात 'व्हिलबेस' १५० मिलीमीटर लांब आहे. कमी वजनाचं ट्विन टर्बो चार्ज्ड ४.० लीटरचा V8 पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. याची पॉवर ५५० पीएस आणि टॉर्क ७७० एनएम आहे. गाडीचं इंजिन नव्या ८-स्पीड पीडीके ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आलंय. ही ऑल व्हिल ड्राईव्ह कार आहे. केवळ ३.८ सेकंदात ही १०० किलोमीटर प्रती तास वेग ही गाडी घेते.


यामध्ये स्पोर्ट क्रोनो पॅकेजचाही ऑप्शन उपलब्ध आहे. यात ती ० ते १०० चा स्पीड ३.६ सेकंदात पकडू शकते. या गाडीचा अधिकाधिक वेग ३०६ किलोमीटर प्रती तास ठेवण्यात आलाय. या गाडीची किंमत १.९३ करोड रुपये आहे...


पॅनामेरा टर्बो एक्झीक्युटिव्ह


या गाडीतही पॅनामेरा टर्बोचंच इंजिन देण्यात आलंय. सध्या बाजरात असलेल्या जुन्या पॅनामेरा सारखंच याचं डिझाईन करण्यात आलंय. या गाडीची किंमत २.०५ करोड रुपये निर्धारित करण्यात आलीय.