मुंबई : कलेची आवड प्रत्येकाला असते. पण प्रत्येकाला कला अवगत असेलच असं नाही. मग त्यासाठी तांत्रिक शॉर्टकट्स वापरले जातात. चित्रकलेची आवड असणाऱ्यांमध्ये असाच एक शॉर्टकट सध्या लोकप्रिय होतोय. अॅपल अॅप स्टोअरवर सर्वप्रथम लॉन्च झालेलं प्रिझमा फोटो एडिटिंग अॅप.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये तुम्ही तुमच्या फोटोचं रूपांतर एका सुंदर चित्रात करू शकता. अनेक प्रसिद्ध चित्रकारांची शैली यात दिसून येईल. या अॅपची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याचे अँड्रॉइड व्हर्जन गेल्या महिन्यात खुले करण्यात आले. शाहरूख खान, वरूण धवन यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनेदेखील प्रिझमामध्ये एडिट केलेले फोटो शेअर केलेत.