ईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचं निधन
ईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचं निधन झालं. अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन हे 74 वर्षांचे होते. ह्रद्यविकाराच्या झटक्याने शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
वॉशिंग्टन : ईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचं निधन झालं. अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन हे 74 वर्षांचे होते. ह्रद्यविकाराच्या झटक्याने शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना, रे टॉमिल्सन यांनी 1971 मध्ये पहिला ईमेल पाठवला आणि ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली. रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली, तेव्हा इंटरनेटची सुरुवादेखील झाली नव्हती. मात्र जगात ही क्रांती घडायला पुढची २० वर्षं जावी लागली.
टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर केला होता जो आजपर्यंत वापरला जातो. 2012 मध्ये इंटरनेट सोसायटीने इंटरनेच हॉल ऑफ फेममध्ये टॉमिल्सन यांचा समावेश केला होता.
टॉमिल्सन यांनी १९६० सालीच SNDMSG या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचं तंत्र विकसित केलं होतं. यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युजरला पाठवण्याची व्यवस्था होती.