नवी दिल्ली :  रिलायन्स जिओ ५ सप्टेंबरला लॉन्च झाले आहे.  सर्वांना माहिती असेल की रिलायन्सचे सिम घेतल्यानंतर तीन महिने ४ जी नेट आणि ४५०० मिनिटांचे व्हॉइस कॉल फ्री असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्सने जिओने वेगवेगळे प्लान लॉन्च केले आहे, त्यामुळे त्याचे फिचरही वेगवेगळे आहेत.  यात तुम्हांला काही टर्म आणि कंडीशन माहिती असली पाहिजे. 


१) व्हॉइस कॉल संपूर्णपणे फ्री आहे, व्हॉइस कॉलिंगसाठी ४ जी डाटासाठी कोणताही चार्ज लागणार नाही. 


२) अनलिमिेड अँड नाइटचा फायदा केवळ तीन तास मिळणार आहे. कंपनीच्या नियमानुसार ग्राहक रात्री २ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत अनलिमिटेड नेट यूज करू शकणार आहेत. 


३) ग्राहकाला टेरिफ प्लानचा फायदा १ जानेवारी २०१७ पर्यंत मिळणार आहे.


४) प्रीपेड टेरीफमधून सर्व योग्य कर लागू करण्यात येतील. 


५) ज्या फ्री बेनिफिट्सला ग्राहकाने यूज केले नाही तर ते व्हॅलिडिटी संपल्यानंतर संपणार आहेत. 


६) विद्यार्थ्यांना २५ टक्के अतिरिक्त ४ जी आणि वायफाय डाटा देण्यात येणार आहे. त्याने आपले वैध प्रमाण पत्र सादर करावी लागणार आहेत. २५ टक्के ४ जी वाय-फाय डाटा त्यांचे लाभ विद्यार्थ्यांना त्याचे ओळखपत्र दाखविल्यानंतर मिळणार आहेत. 


७) प्रीपेड टेरिफमध्ये सर्व कर समाविष्ट करण्यात आले आहेत. 


८) प्लानमध्ये ठराविक वाय-फाय डाटाचा फायदा RJILच्या पब्लिक वायफाय हॉटस्पॉटमधून मिळणार आहेत. 


९) पोस्ट पेड टेरिफमध्ये सर्व कर समाविष्ट करण्यात आले आहेत. पोस्टपेड ग्राहकाला आपले मोबाईल बिल जमा केल्यानंतर ऑटो डेबिट ऑप्शनचा  वापर करावा लागणार आहे. त्यांनी ई-बिलचा उपयोग केला तर त्यांचे १५ टक्के सूट मिळणार आहेत. 


१०) हे सर्व प्लान त्या सर्व ग्राहकांना मिळणार आहेत, ज्यांच्याकडे LTE सपोर्टचे हँडसेट आहेत.