मुंबई : रिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला जरी बंद होणार असली तरी तुम्ही वर्षभर फ्री इंटरनेट वापरु शकता. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल ना. मात्र, कसे ते आम्ही सांगतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने रिलायन्स जिओच्या वेलकम ऑफरला टाच आणली आहे. 3 डिसेंबरपर्यंत जे ग्राहक जीओचे सिम घेतील त्यांना 31 डिसेंबरपर्यंत मोफत टाडा मिळणार आहे. मात्र, असे जरी असले तरी LYF या स्मार्टफोनवर तुम्हाला वर्षभर अनलिमिटेड टाडा मोफत मिळणार आहे.


LYF हा स्मार्टफोनवर तुम्हाला खरेदी करावा लागेल आणि जिओचे सिम घ्यावे लागेल. या दोन्ही गोष्टी तुम्ही रिलायन्सच्या कोणत्याही स्टोअर्समध्ये जाऊन खरेदी करु शकता. युजर्सला KYC डॉक्युमेंट आणि फोटोग्राफ, आधारकार्ड घेऊन जावे लागणार आहे. तसेच MY Jio App डाऊनलोड करावे लागेल. लॉगइन केल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डाटा मिळेल.


ट्रायने म्हटले आहे की, तुम्ही वेलकम ऑफर 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस देऊ शकत नाही. त्यामुळे 3 डिसेंबरपर्यंत रिलायन्स जिओची सेवा घेणाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत मोफत टाडाची सेवा मिळणार आहे. जिओ आपली कमर्शिअल सेवा 5 डिसेंबरला लॉन्च करणार आहे.