मुंबई : फुकटामध्ये सेवा देणाऱ्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला मागच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २२.५ कोटींचं नुकसान झालं आहे. ३१ मार्च २०१७ला संपलेल्या सहा महिन्यांची ही आकडेवारी आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये हेच नुकसान ७.४६ कोटी रुपये एवढं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचं आर्थिक वर्ष हे रिलायन्स जिओसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे कारण यावर्षापासून रिलायन्सनं जिओ ग्राहकांकडून सेवाशुल्क आकारायला सुरुवात केली आहे. १२ कोटी ग्राहकांपैकी जवळपास ७.२ कोटी ग्राहकांनी रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशीप घेतली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षामध्ये जिओला नफा होईल, असा अंदाज वर्तवला जातो आहे.