नवी दिल्ली : रिलायन्स जिओ आज आणखी एक धमाका करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार जिओ कंपनी आज दोन नवे फीचर फोन लाँच करु शकते. हे दोन्ही फोन ४जी असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या मोबाईल्सना ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरुनही यूजर्स खरेदी करु शकतात. दरम्यान, अद्याप कंपनीकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेलील नाही. 


त्यामुळे ज्यांच्याकडे ४जी सपोर्ट फोन नाहीये. त्यांच्यासाठी जिओचे हे फोन चांगले पर्याय ठरु शकतात. हे दोन्ही फोन कीपॅडवाले असणार आहेत. ९९९ रुपयांच्या या फोनमध्ये २ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा अशणार आहेत. तसेच सेल्फीसाठी VGA कॅमेरा देण्यात आलाय. यात 1800 mAH बॅटरी असणार आहे. 


कंपनी ९९९ रुपयांच्या फोनव्यतिरिक्त 1499 रुपयांचा नवा फोनही लाँच कऱणार आहे. यात ५ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा असेल तसेच 2300mAH बॅटरी असेल.