रिलायन्स जिओ : ग्राहकांनो, काही `फुकटात` मिळणार नाही!
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं आज `रिलायन्स जियो` मार्केटमध्ये दाखल करून एकच खळबळ उडवून दिली.
मुंबई : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं आज 'रिलायन्स जियो' मार्केटमध्ये दाखल करून एकच खळबळ उडवून दिली.
पण, यावेळी रिलायन्सनं केलेले दावे निव्वळ दिखावा असल्याचं समोर येतंय. सगळं काही फ्री असल्याचा दावा रिलायन्सनं केलाय. परंतु, रिलायन्सच्या टेरिफ प्लानमागच्या तीन पिलर्सबद्दल समजल्यानंतर तुमचा हा भ्रम दूर होईल.
रिलायन्सचे तीन पिलर्स...
रिलायन्सचे तीन पिलर्समधला पहिला पिलर म्हणजे यूझर्ससा डेटासाठी पैसे खर्च करावे लागतील किंवा व्हॉईस कॉलसाठी... दुसरा म्हणजे, डेटा स्वस्त असायला हवा आणि तिसरा म्हणजे किंमती सरळ असायला हव्यात. रिलायन्सच्या दाव्यानुसार, रिलायन्स जिओचे टेरिफ प्लान्स जगातील सर्वात स्वस्त प्लान असू शकतील.
फसवी जाहिरात?
व्हॉईस कॉल VoLTE च्या माध्यमातून होईल. यासाठी दुसऱ्या फोनवरदेखील VoLTE असायला हवं. VoLTE च्या माध्यमातून तुम्ही फ्री व्हॉईस कॉल नक्कीच करू शकाल... ते रोमिंग फ्रीदेखील असेल. पण, यासाठी तुम्हाला डेटासाठी मात्र पैसे खर्च करावे लागतीलच.
डेटा चार्ज लागणार...
लार्ज पॅक XL, XXL आणि XXXL यांच्या किंमती क्रमश: 999 रुपये, 1499 रुपये, 2499 रुपये आणि 4999 रुपये असतील. डॅटा पॅकमध्ये युझर्सना फ्री व्हॉईस कॉलदेखील मिळतील. परंतु, यासाठीही डेटा चार्ज लागू राहील.
अॅपसाठीचा डेटा फ्री नाही
अॅपचं सब्स्क्रिप्शन फ्री असेल पण या अॅपवर तुम्ही जो डेटा वापरणार त्यासाठी मात्र तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. डेटा पॅक्समध्ये रिलायन्स जिओच्या प्रीमियम अॅपची सुविधा मिळेल. परंतु, हे सगळे अॅप युझर्सना डिसेंबर 2017 पर्यंतच फ्री आहेत.
स्लो अॅप आणि डेटा खर्च
यात एकूण 11 अॅप्लिकेशन्स आहेत. जिओ प्ले, जिओ ऑन डिमांड, जिओ बीट्स, जिओ मेगा, जिओ एक्सप्रेस न्यूज, जिओ ड्राइव्ह, जिओ सिक्युरिटी आणि जिओ मनी... जर तुम्ही जिओ सिम खरेदी केलं तर हे अॅप्स तुम्ही डिसेंबर 2017 पर्यंत वापरू शकाल. पण, उल्लेखनीय म्हणजे हे अॅप सध्या तरी खूपच स्लो काम करतात.