जिओची नवी ऑफर, ग्राहकांना मिळणार 120 जीबी डेटा फ्री
जिओची फ्री डेटा सर्व्हिस येत्या 31 मार्चला संपणार आहे. त्यासोबतच जिओ यूझर्सला प्राईम मेंबरशिप घेण्यासाठीची मुदत 31 मार्चला संपतेय. 31 मार्चनंतर जिओची सर्व्हिस पेड होणार आहे.
मुंबई : जिओची फ्री डेटा सर्व्हिस येत्या 31 मार्चला संपणार आहे. त्यासोबतच जिओ यूझर्सला प्राईम मेंबरशिप घेण्यासाठीची मुदत 31 मार्चला संपतेय. 31 मार्चनंतर जिओची सर्व्हिस पेड होणार आहे.
रिलायन्स जिओने प्राईममेंबरशिपनंतर Buy One Get One Free ऑफरची घोषणा केली होती. या ऑफरमध्ये कंपनी 303 रुपयांच्या प्लान घेणाऱ्यांना 5 जीबी 4जी डेटा आणि 499 रुपयांचा प्लान घेणाऱ्यांना 10 जीबी 4जी डेटा फ्री देणार असल्याच्या घोषणा केल्या होता. यापूर्वी हा प्लान एका महिन्यासाठी वैध होता. मात्र आता आणखी एक नवा प्लान आलाय. यात तुम्ही 1 वर्षापर्यंत या मंथली फ्री डेटाचा लाभ घेऊ शकता.
फ्री डेटा मिळवण्याची प्रक्रिया
60 जीबी डेटा आणि 120 जीबी डेटा फ्री मिळवण्यासाठी युझरला 12 महिन्यांचे रिचार्ज एकत्र करावे लागेल. जर तुम्ही 303 रुपयांच्या प्लान घेत आहात तर 12 महिन्यांसाठी तुम्हाला एकत्रितरित्या 3636 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. यात तुम्हाला 28 जीबी/महिना डेटासह 5 जीबी अधिक डेटा फ्री मिळेल. म्हणजेच 12 महिन्यात तुम्हाला 60 जीबी डेटा फ्री मिळेल. याचप्रमाणे 499 रुपयांचा प्लान घेणाऱ्या यूझर्सनी एकत्रित 12 महिन्यांचे 5,988 रुपयांचे रिचार्ज केल्यास यूझर्सला 120 जीबी डेटा फ्री मिळेल. हा डेटा दर महिन्याला 10 जीबीच्या रुपात मिळेल.