मुंबई : रिलायंस जिओने लॉन्चिंगनंतर एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कंपनीने एका महिन्यात जवळपास दीड कोटी ग्राहक बनवले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे. कारण जगात इतक्या कमी वेळात कोणीही आपले इतके युजर्स बनवलेले नाहीत. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपने ही इतक्या कमी वेळात ऐवढे युजर्स बनवले नव्हते.


रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी रिलायंस जिओच्या 4जी सेवेची घोषणा ५ सप्टेंबरला केली होती. २६ दिवसातच त्यांनी १.६ कोटी युजर्स मिळवल्याचं कंपनीने म्हटलं आहे. रिलायन्स जिओ सध्या 'वेलकम ऑफर' देत आहे. डिसेंबरपर्यंत त्यांनी काही सेवा फ्री दिल्या आहेत. कंपनीने आयफोनच्या युजर्ससाठी एक नवी फ्री स्किम आणण्याचा निर्णय घेतला आहे. जी २०१७ पर्यंत फ्री दिली जाणार आहे. १० कोटी ग्राहक तयार करण्याचं रिलायन्सचं लक्ष्य आहे.