रिलायन्स जिओनं समर सरप्राईज ऑफर घेतली मागे
ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जिओनं त्यांची समर सरप्राईज ऑफर मागे घेतली आहे.
मुंबई : ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जिओनं त्यांची समर सरप्राईज ऑफर मागे घेतली आहे. या निर्णयामुळे जिओच्या प्राईम मेंबर्सना मिळणारी तीन महिन्यांची जास्तीची सेवा आता घेता येणार नाही. ट्रायनं हे आदेश दिले असले तरी ज्या ग्राहकांनी ही ऑफर आधीच घेतली आहे त्यांना पुढच्या ३ महिन्यांसाठी मोफत सेवा मिळणार आहे, असं रिलायन्स जिओनं सांगतिलं आहे.
३१ मार्चला फ्री सेवा संपल्यानंतर जिओनं समर सरप्राईज ऑफर लॉन्च केली. या ऑफरनुसार ग्राहकांना ९९ रुपयांची प्राईम मेंबरशीप घ्यावी लागणार होती तसंच १५ एप्रिलपर्यंत ३०३ रुपयांचं रिफील करणं बंधनकारक होतं.