रिलायन्स जिओला टक्कर, व्होडाफोनची अनलिमिटेड ऑफर
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन मैदानात उतरली आहे. त्याआधी एअरटेल, आयडियाने नवीन प्लानची घोषणा केली. जिओच्या अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि एअरटेल, आयडिया या कंपनींनी विविध ऑफर सुरु केली. आता व्होडाफोनने आपला नवी योजनी आणली आहे.
मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन मैदानात उतरली आहे. त्याआधी एअरटेल, आयडियाने नवीन प्लानची घोषणा केली. जिओच्या अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि एअरटेल, आयडिया या कंपनींनी विविध ऑफर सुरु केली. आता व्होडाफोनने आपला नवी योजनी आणली आहे.
देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी व्होडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांना देशात अनलिमिटेड व्हाईस कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही योजना आजपासून लागू झाली. प्रीपेड ग्राहक १४४ रुपयांपेक्षा जास्त रिचार्जवर अनलिमिटेड कॉलचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर व्होडाफोनवर रोमिंग मोफत असणार आहे. आणि ५० एमबी इंटरनेट डेटा मिळणार आहे.