मुंबई : मागील वर्षी देशाच्या टेलिकॉम मार्केटमध्ये प्रवेश करणारी रिलायंस जिओची मार्चमध्ये ऐवरेज 4G डाउनलोड स्पीड 16.48 होती. जी एअरटेल आणि आयडिया पेक्षा दुप्पट होती. टेलिकॉम रेग्युलेटर ट्राईच्या मासिक रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, रिलायंस जिओची ऐवरेज डाउनलोड स्पीड 16.48 मेगाबाईट पर सेकंड होती. आइडियाचा 8.33 एमबीपीएस तर एअरटेल 7.66 एमबीपीएस स्पीड देत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

16 एमबीपीएसची स्पीडवर यूजर्स एक बॉलिवूड सिनेमा जवळपास ५ मिनिटात डाऊनलोड करु शकतो. मार्चमध्ये वोडाफोनची ऐवरेज डाउनलोड स्पीड 5.66 एमबीपीएस तर रिलायंस कम्युनिकेशनची 2.64 एमबीपीएस, टाटा डोकोमोची  2.52 एमबीपीएस, बीएसएनएलची 2.26 एमबीपीएस आणि एअरसेलची 2.01 एमबीपीएस होती. ट्राई डाउनलोड स्पीड ही डेटाच्या वास्तविक वेळेच्या आधारावर त्यांच्या मायस्पीड अॅप्लिकेशनच्या मदतीने मोजतो.


दिल्ली, मुंबई आणि कर्नाटक, तमिळनाडूमध्ये मोबाईल नेटवर्क स्पीडवर खाजगी फर्म ओपन सिग्नलने केलेल्या सर्वेच्या आधारे म्हटलं आहे की, एअरटेल 11.5 एमबीपीएसची ऐवरेज 4G डाउनलोड स्पीडसह जलद नेटवर्क होतं. तर रिलायंस जिओ 3.92 एमबीपीएससह चौथ्या स्थानावर आहे.


ओपन सिग्नलचं म्हणणं आहे की, त्यांनी डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 यादरम्यान 93,464 यूजर्सच्या आधारे 1.3 अरब डेटा पॉइंटने माहिती गोळा केली. ओपन सिग्नलने एअरटेलला मात्र नंबर एकची कंपनी ठरवली आहे.