मुंबई : रिलायंस जिओ संबंधित गुरुवारी आज आणखी एक मोठी घोषणा झाली आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की, ४ डिसेंबरपासून नव्या युजर्सला देखील फ्री सेवा देण्यात येणार आहे. डेटा, वॉईस सेवा पूर्णपणे फ्री देण्यात आल्या आहेत.


जिओची पहिली फ्री सेवा ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत होती. पण आधीच्या ग्राहकांना देखील आता ही सेवा देखील ३१ मार्च २०१७ पर्यंत मोफत देण्यात आली आहे. रिलायंसने आधी म्हटलं होतं की, डिसेंबरनंतर प्लान पॅकेज जाहीर केले जाणार आहेत. पण सध्या तरी ३१ मार्चपर्यंत रिलायन्सने ग्राहकांना खूशखबर दिली आहे.