मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जिओने ग्राहकांना त्यांच्या सोबत जोडून ठेवण्यासाठी नव्या नव्या ऑफर आणल्या आहेत. जिओने १ एप्रिलच्या आधीच्या जुन्या ग्राहकांसाठी ९९ रुपयाची प्राईम मेंबरशिप ऑफर आणली होती. पण कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर आणली आहे. आता जिओच्या ग्राहकांना हे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायंस जिओच्या JIO MONEY अॅपचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. JIO MONEY च्या ट्विटर हँडलवर कंपनीने ट्विट करत म्हटलं आहे की, JIO MONEY वर रिचार्ज केल्यास ग्राहकाला प्रत्येक रिचार्जवर 50 रुपये कॅशबॅक मिळेल. तर प्राइम मेंबरशिप घेतल्यास यूजर्सला ९९ रुपये सब्सक्रीप्शन फी आणि ३०३ रुपये मंथली टेरिफ द्यावे लागेल.


जर यूजर ९९ रुपये मेंबरशिप आणि ३०३ रुपये टेरिफ रिचार्ज करतो तर त्याला या दोन रिचार्जवर (50+50) 100 रुपये कॅशबॅक मिळेल. अशा प्रकारे कंपनीकडून प्राईम मेंबरशिप फीस त्यांना परत मिळणार आहे. ही कॅश बॅक ऑफरसाठी तुम्हाला आधी रिचार्ज करावा लागेल त्यानंतर २ दिवसाच्या वर्किंग डेमध्ये तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे. कंपनीची ही ऑफर जिओच्या ग्राहकांसाठी फायद्याची ठरु शकते.