मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅच हटवा घरच्या घरी
काही कारणांमुळे मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडतात. कधी पाकिटात ठेवताना, तर मोबाईल खाली पडल्याने मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडतात. यावेळी आपल्याला मोबाईलचे स्क्रॅच गार्ड बदलावे लागते. मात्र हा खर्चिक उपाय करण्यापेक्षा मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅचेस हलके असतील तर तुम्ही घरच्या घरी ते हटवू शकता.
मुंबई : काही कारणांमुळे मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडतात. कधी पाकिटात ठेवताना, तर मोबाईल खाली पडल्याने मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडतात. यावेळी आपल्याला मोबाईलचे स्क्रॅच गार्ड बदलावे लागते. मात्र हा खर्चिक उपाय करण्यापेक्षा मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅचेस हलके असतील तर तुम्ही घरच्या घरी ते हटवू शकता.
हे आहेत ७ उपाय
१. टूथपेस्टच्या मदतीने तुम्ही मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅचेस हटवू शकता.
२. बेकिंग सोडाच्या वापरानेही स्क्रीनवरील स्क्रॅचेस हटवले जाऊ शकतात. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून ते मिश्रण स्क्रॅचवर लावा आणि कपड्याने पुसून टाका.
३. स्मार्टफोनची स्क्रीन साफ करण्यासाठी तुम्ही तेलाचाही वापर करु शकता.
४. स्क्रीनवरील स्क्रॅचेस मिटवण्यासाठी व्हॅसलीनचाही वापर करता येऊ शकतो.,
५. स्क्रीनवरील स्क्रॅच हलका असेल तर पेन्सिल इरेझरचाही वापर करता येईल.
६. बाजारात उपलब्ध असलेल्या कार स्क्रॅच रिमूव्हर क्रीमही तुम्ही मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅचेस घालवण्यासाठी करु शकता.
७. तसेच सँडपेपरचा वापरही तुम्ही स्क्रॅचेस घालवण्यासाठी करु शकता. मात्र ध्यानात ठेवा की प्लास्टिक फ्रेम अथवा ग्लॉसी बॅक कव्हरसाठी सँडपेपरचा वापर करु नका.