स्मार्टफोन हँग होतोय का ? तर करा एवढंच
आज स्मार्टफोनचा उपयोग एका कंप्युटरप्रमाणे होतोय. फोन कॉल हा एक फिचर आहे पण यासारखे अनेक फिचर आता स्मार्टफोनमध्ये दिलेले आहे. त्यामुळे इंटरनेट कनेक्शन असलं की आणखी अॅप्लीकेशन आपण फोनमध्ये वापरायला सुरु करतो.
मुंबई : आज स्मार्टफोनचा उपयोग एका कंप्युटरप्रमाणे होतोय. फोन कॉल हा एक फिचर आहे पण यासारखे अनेक फिचर आता स्मार्टफोनमध्ये दिलेले आहे. त्यामुळे इंटरनेट कनेक्शन असलं की आणखी अॅप्लीकेशन आपण फोनमध्ये वापरायला सुरु करतो.
काही वेळेनंतर अॅप्लीकेशन अधिक असल्याने फोन हँग होण्यास सुरुवात होतो. फोन गरम होतो. त्यामुळे आपण फोन रिस्टार्ट करतो किंवा काही अॅप्लीकेशन डिलीट करतो.
ऐवढं सगळ करुनही फोन हँग होत असेल तर मग फोन रिसेट करण्याशिवाय इतर उपाय नाही. फोन रिसेट करणं एवढं कठिन नाही.
१. सगळ्यात आधी फोनच्या सेटींगमध्ये जा आणि प्रायवसी ऑप्शन सिलेक्ट करा.
२. यानंतर बॅकअप माय डेटा आणि ऑटोमेटीक रिस्टोर ऑप्शनवर टीक करुन मार्क करा. त्यामुळे तुमचा डेटा सेव्ह राहिल.
३. टिकमार्क केल्यानंतर फॅक्ट्री डेटा रिसेट ऑप्शनवर क्लिक करा.
४. रिसेट केल्यानंतर तुमची पहिली स्क्रिन दिसेल. स्क्रिन अनलॉक करा.
५. आता तुम्ही तुमच्या फोनला रिसेट फोन पर्यायवर जाऊन रिसेट करु शकता.