मुंबई : देशातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा करणारी रिंगींग बेल ही कंपनी उद्या म्हणजेच 8 जुलैपासून फ्रीडम 251 या फोनची डिलिव्हरी द्यायला सुरुवात करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टप्प्य़ामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं पाच हजार फ्रीडम 251 ची डिलिव्हरी 8 जुलैपासून सुरु करेल असं रिंगींग बेल्सचे मोहित गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. या स्मार्टफोनबरोबरच कंपनी आता 9,990 रुपयांमध्ये एलईडी टीव्हीदेखील विकणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं आहे. 


251 रुपयांमधले असे दोनलाख स्मार्टफोन विकायला आम्ही तयार आहोत, पण यासाठी सरकारकडून सहय़ोगाची अपेक्षा आहे, असंही गोयल म्हणाले आहेत. वेगवेगळे आरोप झाल्यानंतरही तीस हजार ग्राहकांनी फोनचं बूकिंग केलं, तर सात कोटी लोकांनी यासाठी साइंड अप केलं अशी प्रतिक्रिया गोयल यांनी दिली. 


सरकारनं कारवाईचा बडगा उगारल्यानंतर या कंपनीनं फोन बूक केलेल्यांचे पैसे परत दिले. यानंतर ज्यांनी फोन बूक केला होता, त्यांना फोनची डिलिव्हरी मिळाल्यानंतर पैसे घेणार असल्याचा निर्णय कंपनीनं घेतला.