रॉयल एनफिल्डची `रेडिच क्लासिक 350` लॉन्च!
रॉयल एनफिल्डनं `रेडिच क्लासिक 350` ही नवी कोरी बाईक लॉन्च केलीय. ही बाईक तीन कलरमध्ये उपलब्ध असेल.
नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डनं 'रेडिच क्लासिक 350' ही नवी कोरी बाईक लॉन्च केलीय. ही बाईक तीन कलरमध्ये उपलब्ध असेल.
महत्त्वाचं म्हणजे या बाईकची किंमत... 'रेडिच क्लासिक 350'ची दिल्लीमध्ये किंमत 1.46 लाख रुपये असेल.
या बाईकमध्ये 350 सीसी सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन, 19 एचपी इंजिन पॉवर आणि 28 एनएमचा टॉर्क जेनरेट आहे.
रॉयल एनफिल्डची 'क्लासिक 350' ही बाईक सर्वात अधिक विक्री होणारी बाईक आहे... त्यातच नवंपण आणून ही बाईक लाल, हिरवा आणि निळा अशा तीन रंगात ग्राहकांसमोर आणण्यात आलीय.
'फ्लाईंग फ्ली'
'फ्लाईंग फ्ली' मॉडेलमधून प्रेरणा घेत हे मॉडेल सादर करण्यात आल्याचं काहींचं म्हणणं आहे. फ्लाईंग फ्ली ही 125 सीसीची 2 स्ट्रोक असलेली हलकी बाईक होती. 1950 च्या दशकात ही बाईक वापरली जात होती. हलकी असल्या कारणानं ही बाईक समुद्रातून लॉन्चमधून घेऊन जाणंही सहज शक्य होतं.
'रेडिच' म्हणजे काय?
रेडिच हे इंग्लंडमधलं एक शहर आहे... ही तीच जागा आहे जिथं रॉयल एनफिल्ड या ब्रॅन्डचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धात इथूनच गाड्या बनवून त्यांचा पुरवठा केला जात होता. प्लान्ट बंद करण्यात आल्यानंतर या कंपनीनं आपलं बस्तान भारतात बसवलं.