नवी दिल्ली : एका खास वर्गासाठी बाईक बनवणाऱ्या टू व्हिलर निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डनं आपली 'हिमालयन' ही नवी कोरी बाईक कमर्शिअली लॉन्च केलीय. ही बाईक आता बाजारात उपलब्ध झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्याच स्थानांवर चालणारी ही ४११ सीसी बाईक लॉन्च करून रॉयल एनफिल्डनं स्पोर्टस  सेगमेन्टमध्ये प्रवेश केलाय. 


आयशर मोटर्सची टू व्हिलर्सच्या या कंपनीचे बुटेल, क्लासिक, थंडरबर्ड आणि कॉन्टिनेन्टल जीटी या बाईक्स ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. 


शहरी, ग्रामीण तसंच रफ रोडवरदेखील ही बाईक सहजरित्या चालवता येणार आहे. आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ लाल यांच्या म्हणण्यानुसार, 'रोमांचक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी हा एक नवा प्रयोग आहे. या बाईकच्या माध्यमातून आपल्याला अनेक रोमांचक प्रवास अनुभव घेणारे मिळतील. आता, पाहायचंय की हा बदल ग्राहक तेजीनं स्वीकारतात की तो हळू-हळू पुढे जाणार'.


घरगुती बाजारावर आमचं लक्ष आहे. परंतु, हिमालयनमध्ये सगळ्याच बाजारांनी रुची दाखवलीय जिथे आम्ही उपस्थित आहोत. यामध्ये अमेरिका आणि युरोपही सामिल आहे. काही बाईक लॅटिन अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियामध्येही पाठवण्यात येणार आहेत. 


हिमालयनमध्ये गिअरबॉक्स आणि २४.५ बीएचपीचं इंजिन आहे. महाराष्ट्रात या बाईकची शोरूम किंमत १.५५ लाख रुपये आहे. मुंबईत, ऑन रोड या बाईकची किंमत असेल १.७८ लाखांपर्यंत... 


'एअर पोल्युशन'शी निगडीत बीएस ४ स्टँडर्ड नसल्यामुळे ही बाईक दिल्ली शहरात विकली जाणार नाही. परंतु, गुरगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा या परिसरात मात्र ही बाईक १.७९ लाख रुपयांना उपलब्ध होईल.