मुंबई : सॅमसंगनं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलक्सी एस ७ चं अॅक्टिव्ह व्हेरिएन्ट लॉन्च केलंय. हा मोबाईल सध्या केवळ अमेरिकन बाजारात लॉन्च करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० जूनपासून हा मोबाईल विक्रिसाठी उपलब्ध असेल. सँडी गोल्ड, कॅमो ग्रीन आणि टायटेनियम ग्रे कलर अशा तीन कलर्समध्ये हा मोबाईल उपलब्ध असेल. 


फिचर्स


गॅलक्सी एस ७ अॅक्टिव्हमध्ये (२५६० X १४४० पिक्सल) रिजॉल्युशनसोबत ५.१ इंच क्वाड एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आलाय. स्क्रीनवर सुरक्षिततेसाठी गोरिला ग्लास ४ देण्यात आलाय. तर क्वाड कोर स्नॅनड्रॅगन ८२० प्रोसेसरसोबत ४ जीबी रॅम या स्मार्टफोनमध्ये आहे. 


उल्लेखनीय म्हणजे, ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज आहे. याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्यानं २०० जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं.


रिअर कॅमेरा १२ मेगापिक्सल तोही एलईडी फ्लॅशसहीत तसंच ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. हा फोन वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट आहे. हा स्मार्टफोन ६.०.१ मार्शमॅलोवर चालतो. तसंच यात फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलाय. स्मार्टफोनमध्ये ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आलीय. 


स्मार्टफोन गॅलक्सी एस ७ अॅक्टिव्ह

किंमत आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफर


हा स्मार्टफोन ग्राहकांना ३० महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्टवर २६.५० डॉलर्स (१७६८ रुपये) प्रति महिना आणि २४ महिन्यांसाठी ३३.१३ डॉलर्स (२२१० रुपये) मध्ये उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची किंमत आहे ७९५ डॉलर्स म्हणजेच जवळपास ५३,१५० रुपये.