बाईकस्वारांसाठी सॅमसंगचा खास मोबाईल
नवी दिल्ली : मोबाईल उत्पादनातील जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगने गॅलॅक्सी जे३ हा नवीन मोबाईल लाँच केलाय. या मोबाईलची खासियत अशी की हा मोबाईल खास बाइकस्वारांसाठी तयार करण्यात आला आहे. या मोबाईलची किंमत ८,९९० रुपये इतकी आहे.

या मोबाईलमध्ये एक 'एस बाईक मोड' नावाचं फीचर देण्यात आलं आहे. हे फीचर भारतीय तंत्रज्ञांच्या एका गटाने विकसित केलंय. बाईक चालवताना हे फीचर सुरू केल्यास तुम्हाला कॉल करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही बाईक चालवत आहात अशी आपोआप सूचना मिळू शकेल.
कॉल करणाऱ्या व्यक्तीला तुमच्याशी बोलणे अगदीच गरजेचे असेल तर त्याला १ हा क्रमांक दाबावा लागेल. यामुळे तुम्हाला सूचना मिळेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्या गरजेचे बोलायचे आहे.
आपल्या देशात अनेक जण मोबाईलवर बोलत वाहन चालवतात. यामुळे अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी आणि चालकांची सुरक्षितता जपण्यासाठी कंपनीने हे नवीन फीचर लाँच केलं, असं सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष असीम वारसी म्हणाले